सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; 
सुलतानपूर येथे स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने जप्त केले १७१ सिलिंडर..!

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) सणासुदीच्या काळात घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत तब्बल १७१ सिलिंडर जप्त केले आहेत. याप्रकरणी चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून सिलिंडर सह ८ लाख ८ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार २१ ऑगस्ट 2025 रोजी सुलतानपूर येथे करण्यात आली. आरोपीकडून 
भारत गॅस कंपनीचे ११५ आणि 
HP कंपनीचे सिलेंडर ५६ असे एकूण १७१ सिलिंडर जप्त केले आहेत. जप्त केलेला माल पुढील कारवाईसाठी पुरवठा निरीक्षक, लोणार यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई
ASI राजकुमार राजपूत, HC गजानन दराडे, दिनेश बकाले, सतीश मुळे, LHC वनिता शिंगणे,
NPC अरविंद बडगे, PC वैभव मगर, PN राहुल बोर्डे यांच्या पथकाने केली.