BIG BREAKING पोलिसांनी दाखवून दिलं "कानुन के हात लंबे होते हैं!" "तोच" निघाला चिमुकलीचा मारेकरी!

देवीच्या मंदिरासमोर पूजेचे सामान विकणाऱ्याने आधी अत्याचार केला नंतर गळा आवळला! खरा आरोपी शोधून काढण्यासाठी पोलिसांनी लढवलेली युक्ती वाचून तुम्ही सॅल्यूट कराल...

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  संपूर्ण जिल्हाच नव्हे तर अख्खे महाराष्ट्र राज्य हादरवून सोडणाऱ्या तपोवन देवी संस्थान येथील हत्यांकांड प्रकरणात पोलिसांनी मारेकऱ्याला शोधून काढलेच. कोणतेही पुरावे मारेकऱ्याने मागे सोडले नव्हते,मात्र गुन्हेगार कितीही अट्टल असला तरी आपण त्यापेक्षा १० पाऊले पुढे आहोत हे सिद्ध करीत "कानुन के हात लंबे होते हैं!"  हे पोलिसांनी दाखवून दिले. रोहडा येथील तपोवन देवी मंदिर परिसरात पूजेचे साहित्य विकणाऱ्या सदानंद भगवान रोडगे (२६, रा रोहडा, ता चिखली) या नराधमाने ६ वर्षीय चिमुकलीचा बळी घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले. संशयित म्हणून पोलिसांनी आधीच त्याला ताब्यात घेतले होते, आधी "मी तो नव्हेच" अशी भूमिका घेणाऱ्या सदानंदला पोलिसांनी खाक्या दाखवला अन् त्यानंतर मात्र तो पोपटासारखा बोलू लागला. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार या प्रकरणाच्या तपासासाठी तब्बल ६ दिवस अंढेरा पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर या अधिकाऱ्यांनी तपासकार्यात महत्वाची भूमिका बजावली.
 

    
 १२ मे रोजी अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील एक चिमुकली आई वडिलांसोबत रोहडा येथील  तपोवन देवी संस्थान येथे लग्नासाठी आली होती. त्याच दिवशी सकाळी सव्वा अकरा वाजेपासून ती बेपत्ता झाली होती. घटनेची वार्ता पसरताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली मात्र ती सापडली नव्हती. १२ मे च्या संध्याकाळी अंढेरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजेच १३ मे च्या दुपारी तपोवन देवी मंदिराच्या पाठीमागील डोंगराळ भागात चिमुकलीचा मृतदेहच सापडला. मृतदेहावर दगडाची पाळ रचलेली होती, रुमालाने गळा आवळून खून तिचा खून झाल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने तपासावर लक्ष ठेवून होते. उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पोलिसांचे पथक वेगवेगळ्या बाजूंचा विचार करून तपासात व्यग्र होते. दुसरीकडे जनसामान्यांचा प्रक्षोभ होता, एक दिवस चिखली शहरात बंद पुकारण्यात आला होता. आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचा दबाव पोलिसांवर वाढत होता.
    
  पोलिसांनी असा केला तपास..!

तपासादरम्यान पोलिसांसमोर वेगवेगळे प्रश्न उभे राहिले होते. मंदिर परिसरातील सीसीटिव्ही बंद असल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधून काढण्यासाठी मोठे आव्हान होते. हे कृत्य ओळखीतल्या व्यक्तीने केले की अनोळखीने? यात कुटुंबातल्या व्यक्तीचा सहभाग तर नाही ना? कारण पीडित चिमुकलीची आई पतीपासून विभक्त राहत होती, त्यामुळे हे कृत्य तिच्या वडिलांनी तर केले नसावे ना असाही संशय पोलिसांना होता. त्यादृष्टीने देखील पोलिसांची तपासचक्रे फिरत होती. दरम्यान शवविच्छेदन करतेवेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्याने पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी त्यादृष्टीने अनेक जणांची चौकशी केली. परिसरातील अट्टल गुन्हेगारांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले, मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मंदिर परिसरात नारळ व पूजेच्या साहित्याची विक्री करणाऱ्या लोकांची देखील पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी पूजेच्या साहित्याचे दुकान असलेल्या सदानंद भगवान रोडगे या तरुणावर पोलिसांचा संशय बळावला..!

 म्हणून संशय बळावला..!

         ( जाहिरात )

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदानंद च्या चेहऱ्यावर नखांचे व्रण पोलिसांना दिसले. त्याला त्याबद्दल विचारणा केली असता दाढीचे ब्लेड लागल्याचे तो सांगत होता. पात्र दाढी करून देणाऱ्याने ते निशाण ब्लेडचे नसल्याचे सांगितले. सदानंदच्या बोलण्यात वेळोवेळी भिन्नता आढळत होती. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टर करवी सदानंदची तपासणी केली असता त्याच्या चेहऱ्यावरील व्रण नखांचे असल्याचे समोर आले त्यामुळे पोलिसांचा संशय १०० टक्के बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली, आधी नाही नाही म्हणणाऱ्या सदानंद ने नंतर मात्र खुनाची कबुली दिली. आधी सदानंद ने तिच्यावर अत्याचार केला, नंतर बोंब होऊ नये म्हणून त्याने गळा आवळून तिचा खून केल्याचे समोर आले.

  पॉर्न व्हिडिओ पहायचा..

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदानंद ला पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते. त्याच्या मोबाईल च्या सर्च हिस्ट्री मध्ये अधिक वेळ पॉर्न व्हिडिओ सर्च करण्यात आल्याचे दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या अधिकाऱ्यांनी केला तपास..

जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांच्यासह पोलीस पथकाने हा तपास केला.