BIG BREAKING मेरा खुर्द मध्ये तरुणाचा मर्डर! भर चौकात, भर दुपारी कोयत्याने सपासप वार
Jun 23, 2025, 15:17 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे थोड्या वेळापूर्वी थरारक घटना घडली आहे. भर चौकात एका तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला. खून झालेल्या तरुणाचे अंदाजे वय २५ वर्षे आहे.
प्राप्त माहितीनुसार आज,२३ जूनच्या दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या तरुणाचा खून झाला तो तरुण चिखली वरून काळी पिवळी ने मेरा खुर्द चौकी येथे पोहोचला. त्याचवेळी काही तरुण मेरा चौकी येथे त्याची वाट पाहत होते. गाडीतून उतरल्या उतरल्या त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला.. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी खून करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सध्या पंचनामा सुरू आहे... खून झालेला तरुण कोण? खून करण्याचे नेमके कारण काय ? याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती नाही.. घटनेचे सविस्तर वृत्त थोड्याच वेळात "बुलडाणा लाइव्ह" वर प्रकाशित करण्यात येईल...