BIG BREAKING जिल्हा हादरला! जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात सापडले माणसाचे धडापासून वेगळे झालेले मुंडके!
Apr 26, 2026, 10:21 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रविवारच्या सकाळी जिल्हा हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात अतिशय धक्कादायक प्रकरण उजेडात येत आहे. आज सकाळी स्थानिकांना धडापासून वेगळे झालेले एका अज्ञात व्यक्तीचे मुंडके आढळून आले आहे.
प्राप्त माहितीनुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजुरा शिवारात स्थानिकांना धडापासून वेगळे झालेले एक मुंडके दिसले. मुंडक्यावरील केस, मांस गळालेले होते. घटनेची चर्चा पसरतात एकच गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूच्या जंगल परिसरात शोध घेतल्यानंतर धड सुद्धा सापडले आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुलढाण्याहून रवाना झाले आहे. मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही..हा खून आहे की दुसरच काहीतरी याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.