BIG BREAKING: बुलढाणा जिल्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला! मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांत जाणवले धक्के; रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेची नोंद, नागरिकांमध्ये खळबळ!
Nov 14, 2026, 11:13 IST
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा जिल्ह्यात आज (१४ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजून १३ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. जिल्ह्यातील मलकापूर, जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांतील अनेक गावांत हे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात असून रिश्टर स्केलवर ४.५ तीव्रतेची नोंद झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यासह शेजारील जळगाव जिल्ह्यातील रावेर, भुसावळ आणि यावल परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले.
दरम्यान, बुलढाणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुदैवाने जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.