"सर कटी लाश" प्रकरणात मोठी कारवाई! एलसीबी पीआय आणि जळगाव जामोद च्या तत्कालीन ठाणेदारांचे डायरेक्ट निलंबन.. आधी केली होती नियंत्रण कक्षात रवानगी..! पोलिस महासंचालक सदानंद दाते आज अमरावतीत..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीच्या अंतर्गत घडलेल्या सर कटी लाश प्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही. आता या प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.. या आधीच नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आलेल्या एलसीबी पीआय सुनील आंबुलकर यांच्यासह जळगाव जामोद चे तत्कालीन ठाणेदार नितीन पाटील यांच्यावर आता थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत तपासाला अधिक गती देण्यात आली असून मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपासाच्या कक्षा वाढवल्या आहेत..

२६ एप्रिलला घडलेल्या हत्याकांड्या नंतर दोनच दिवसात एलसीबी पथकाने आरोपींचा शोध लागल्याचा दावा करीत बापलेकांना अटक केली होती. त्यानंतर २० दिवसांनी जिच्या खुनाच्या आरोपाखाली बाप लेकांना अटक केली ती शिवानी कळमेकर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने खळबळ उडाली होती.२० दिवस निरपराध बापलेकांना कारागृहात राहावे लागले होते. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यभर एकच खळबळ उडाली होती.एसपी निलेश तांबे यांनी एलसीबी तपास निलंबन करून जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि एलसीबी चे पीआय अंबुलकर यांची नियंत्रण कक्षात परवानगी केली होती..
दरम्यान राज्यभर हे प्रकरण गाजल्यानंतर यात राजकीय हस्तक्षेप देखील वाढला होता. दरम्यान प्रशासकीय चौकशीनंतर आता सुनील आंबुलकर आणि नितीन पाटील यांचे निलंबन केले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. जबाबदारीने तपास करण्याचे निर्देश तपास पथकांना देण्यात आले आहेत..दरम्यान राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आज अमरावतीत पोलीस यंत्रणेचा प्रशासकीय आढावा घेणार आहेत.. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित असाच असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.