मेहकर पोलिसांची मोठी कारवाई! दोन सराईत गुन्हेगार अटकेत; शस्त्रसाठा, मोबाईल व कारसह २.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त...
अटकेत घेतलेल्या आरोपींची नावे अमोल परात्या भोसले (वय २५, रा. वरटाळा, ता. मेहकर) आणि अजय दहीमल भोसले (वय २६, रा. वरदडा (लोणी लव्हाळा, ता. मेहकर) अशी आहेत. झडतीदरम्यान आरोपींकडून एक सुरा, दोन चाकू, एक ऑटोमॅटिक चाकू, रिअलमी मोबाईल आणि डॅटसन रेडी-गो कार असा एकूण २,६६,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान मुख्य आरोपी अमोल भोसले हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध बुलडाणासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, मारहाण व शस्त्र कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५७/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच संबंधित कायद्यांनुसार पुढील तपास सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलोवार, सपोनि.संदिप बिरांजे, प्रदीपकुमार राठोड, पोउपनि. किरण खाडे, Asi सुखदेव गव्हाणे, पोहेकॉ.संजय पवार, लक्ष्मण कटक, प्रभाकर शिवणकर, पोकॉ. समाधान अरमाळ, मोहम्मद परसुवाले, केशव अवचार, करीम शहा, अमोल बोर्डे, गणेश वैदय, पोकों विनोद फुफाटे, मनिष बाजड, नितीन डुकरे, संदीप भोंडाणे, संजय पहारे यांनी पार पाडली