पोरींनो कुणाला फोटो पाठवतांना सावध व्हा! मोताळयाच्या पोराने कांड केले..फोटो, व्हिडिओ पाठवून लग्न मोडण्याची धमकी...  

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रेमात असताना पोरा पोरींना कशाचेही भान राहत नाही..प्रेमात ते नको ते करून बसतात..पुढे मात्र याच भानगडी अडचणीचे कारण ठरतात.. मोताळ्यात घडलेली घटना त्याचेच द्योतक आहे.. प्रेमात असताना ती त्याला फोटो पाठवायची, व्हिडिओ पाठवायचे.. व्हिडिओ कॉल करायची.. तो मात्र या व्हिडिओ कॉल चे स्क्रीन रेकॉर्ड करत होता.. पुढे युवतीचे लग्न खामगावच्या एका तरुणाशी ठरले..त्यानंतर मात्र या कथित प्रियकराने भयानक कांड केले.. प्रेमात असताना तिने पाठवलेले फोटो व्हिडिओ कुटुंबीयांना पाठवून लग्न मोडण्याची धमकी दिली.. चेतन प्रकाश सातव (रा. कोथळी) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याशिवाय या प्रकरणात ऋषिकेश सुरडकर नावाचा आणखी एक दुसरा आरोपी असून तो तरुणीला फोन करून चेतन सोबत बोल असा दबाव टाकत होता..
बोराखेडी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडित तरुणी २६ वर्षांची आहे. तरुणीचे लग्न खामगाव येथील तरुणासोबत ठरल्यानंतर हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. 
आरोपी चेतनचे तरुणीसोबत यादी प्रेम संबंध होते. त्या काळात तरुणीने त्याला पाठवलेली छायाचित्रे तसेच व्हाट्सअप व्हिडिओ कॉल दरम्यान तिच्या संमतीशिवाय करण्यात आलेले स्क्रीन रेकॉर्डिंग त्याने कुटुंबीयांना पाठवून लग्न मोडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ऋषिकेश सुरडकर हा चेतन चा मित्र असून तो तरुणीवर सातत्याने चेतन सोबत बोल असे म्हणत दबाव टाकत होता. या प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कपले करीत आहेत..