पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; चिखली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडेवर गुन्हा...
नमीता विशाल उर्फ रिक्की काकडे वय २९ वर्ष, रा. वार्ड नंबर १३ जुने गाव चिखली, जिल्हा बुलढाणा यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, पती विशाल उर्फ रिक्की रघुवीर काकडे, रेखा रघुवीर काकडे, भावना नकवाल तिन्ही रा. जुना गाव चिखली आदींनी ९ नोव्हेंबरच्या ८ वाजेपासून ते ११.३० वाजेच्या सुमारास आरोपी सासू रेखा काकडे व नणंद भावना नकवाल यांनी पती विशाल उर्फ रिक्की काकडे यास जीवाने ठार मारण्याची चिथावणी दिली. पतीने जीवाने ठार मारण्याचे उद्देशाने घरातील प्लास्टिक बॉटल मधील पेट्रोल अंगावर टाकून गॅस सुरू करून पेटवून दिले. अशा तक्रारीवरून चिखली पोलिसांनी आरोपीतांवर अप. नं. ८९१/२५ १०९.४९. ३(५) भारतीय न्याय संहीता अन्वये कारवाई केली असून आरोपी रिक्की काकडे यास
ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शरद भागवत करीत आहेत.
यातील फिर्यादीचा पती रिक्की काकडे हा चिखली युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असून पक्षांमध्ये सक्रिय असतो. पोलीस स्टेशनमध्ये त्याची पत्नी नमिता सोबत तिचे आई-वडील सुद्धा रिपोर्ट देण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आणि रिक्की काकडे यांनी आपल्या मुलीला दिलेल्या त्रासाचा व त्याच्या वागणुकीचा पाढा वाचला. अशा असामाजिक तत्त्वाने वागणाऱ्या व्यक्तीला चिखलीकरांनी धडा शिकवा असे भावनिक आवाहन त्यांनी सोशल मीडियावर केले आहे.