BIG BREAKING तुरीच्या वावरात गांजा लावला; एलसीबीच्या पथकाकडून कारवाई; लोणार तालुक्यातील हत्ता शिवारात गाजांची झाडे शोधण्याचे काम सुरू! एलसीबीचे पथक अंधारात शोधतायेत गांजाची झाडे! लोणारचे पोलीस झोपेत..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार तालुक्यातून मोठी बातमी समोर येत आहे. बुलडाणा एलसीबी पथकाने हत्ता शिवारातील एका शेतात छापेमारी केली आहे. या शेतात शेकडोच्या पटीत गांजाची झाडे असल्याचे सांगण्यात येत आहे. आज,१२ डिसेंबरच्या सायंकाळ पासून सुरू झालेली ही कारवाई पहाटे पर्यंत चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हत्ता शिवारातील गट नंबर १८१ मध्ये अनिल धुमा चव्हाण याने स्वतःच्या शेतातील तुरीच्या शेतात बंदी असलेली गांजाची झाडे लावली आहेत. एलसीबी पथकाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात एलसीबी पथक हत्ता शिवारातील तुरीच्या शेतात सायंकाळी दाखल झाले. गांजांच्या झाडांची संख्या शेकडोंच्या पटीत आहेत, सध्या अंधार असल्याने बॅटरीच्या प्रकाशात पोलीस गांजांची झाडे शोधत आहेत..ही कारवाई पहाटे पर्यंत चालण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान एलसीबी पथकाला येऊन कारवाई करावी लागत असल्याने लोणारचे पोलीस झोपलेत का ? अवैध धंद्यांवर लोणार पोलिसांचा वचक नाही का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय..