ॲपे डिव्हायडर ला धडकला! एका प्रवाशाचा जागीच मृत्यू; दारू पिऊन चालवत होता ॲपे! चिखलीतील घटना
May 12, 2025, 15:23 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) भरधाव ॲपे वाहनावरील नियंत्रण हुकल्याने ॲपे डिव्हाइडला धडकला. या अपघातात ॲपे मध्ये बसलेला एक प्रवासी जागीच ठार झाला. काल,११ मे च्या सायंकाळी चिखली ते मेहकर फाट्या दरम्यान असलेल्या हॉटेल नीलम वाईन बार जवळ हा अपघात झाला.
प्रकाश बबन झोपाटे (३०, रा. शेलगाव देशमुख, ता. मेहकर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. नायगाव खुर्द येथील संजय दिलीप गायकवाक हे ॲपे चालक ॲपे घेऊन चिखली वरून नायगाव कडे जात होते.
हॉटेल नीलम वाईन बार जवळ ॲपे वरील नियंत्रण हुकल्याने ॲपे डिव्हायडरला जाऊन धडकला. या अपघाता प्रवासी प्रकाश झोपाटे जागीच ठार झाला. चालक गायकवाड दारू पिऊन ॲपे चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली.