संतापजनक..जिल्हा हादरला! साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार! चिकन सेंटर मध्ये पिंपळगाव राजाचा रेहान खान ने केले पाप.....

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे संताजकनक प्रकार उघडकीस आला आहे. साडेनऊ वर्षाच्या चिमुकलीला पन्नास रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर चिकन सेंटर मध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे समाजमनातून संतापंजक प्रतिक्रिया उमटत आहेत..
​​
   पिंपळगाव राजा येथील पेठपुरा भागातील नऊ वर्षीय चिमुकली अंडे घेण्यासाठी तिच्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानात जात होती.याच भागात चिकन सेंटर चालवणारा रेहान खान मुक्तार खान (२४) याने त्या चिमुकलीला पन्नास रुपयांचे आमिष दाखवून आपल्या चिकन सेंटरच्या आत बोलावले. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केला.
 ही घटना पीडित चिमुकलीने आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर घरच्यांनी लगेच १४ मे रोजी रात्री उशीरा पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून रेहान खान विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तातडीने नराधम आरोपी रेहान खान याला नांदुरा तालुक्यातील वसाडी येथून अटक केली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी व पीडित हे एकाच समाजाचे आहेत.