संतापजनक ! वासनांध तरुणाने मंदिरासमोरच केले पाप! मुलगी शिकवणीला जात होती, पण... शेगाव तालुक्यातील घटना 

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शेगाव तालुक्यातून अतिशय संतापजनक बातमी समोर आली आहे. एका वासनांध तरुणाने मंदिरासमोरच मुलीसोबत वाईट कृत्य केले. आज २० जुलै रोजी ही घटना उघडकीस आली. 
 पिडीत मुलीच्या वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. यावरून राजेश उर्फ राजू विंचू याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटना ९ जुलै रोजी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात घडली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी हे शिकवणी वर्गाला जात होती. दरम्यान, राजेश उर्फ राजू हा तिथे आला. त्याने पिडीत मुलीला बघितले. यानंतर गावातील मंदिरासमोरच त्याने तिला अडविले. वाईट उद्देशाने हात धरत राजूने नको ते कृत्य केले. एवढेच नाही तर, पिडीत मुलीला ओढून मंदिरामागे नेण्याच्या त्यांनी प्रयत्न केला. पिडीतेने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका केली. यानंतर, घटनेमुळे घाबरलेल्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार देण्याचे टाळले. परंतु अखेर आज २० जुलै बुधवारी मुलीच्या वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. राजू उर्फ राजेश विंचू याच्या विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.