संतापजनक ! जेवनाच्या कारणावरून स्वतः च्या आईला मारला दगड; जिवे मारण्याची धमकीही  दिली!
मुलावर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा..

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली खुर्द गावातून संताप व्यक्त करणारी बातमी  समोर आली आहे. जेवणाच्या कारणावरून वाद घालत, स्वतःच्या आईला एका दारुड्या मुलाने दगड मारल्याची संतापजनक  घटना रविवारी, २४ मार्च रोजी घडली आहे. याबाबत देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दारुड्या मुलाविरुद्ध आईने तक्रार दिली. त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शशिकला तेजराव झिने यांनी आपल्या मुलाविरुद्ध दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  मुलगा डिगांबर झिने याला दारू पिण्याची सवय असून तो नेहमीच त्यांच्याशी वाद घालतो. रविवार दुपारी २:३० वाजेच्या सुमारास डिगांबर हा दारू पिऊन आला. आणि म्हणाला की, तू जेवण तयार केले नाही. तू आत्ताच मला जेवण्यासाठी दे! तेव्हा आई शशिकला झिने यांनी 'मी शाळू सोंगत आहे तुला जेवण तयार करून देते' असे म्हटले तरीसुद्धा डिगांबर याने त्यांच्यासोबत वाद घातला, शिवीगाळ केली आणि हातात दगड घेऊन आईच्या ओठावर मारला. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यावेळी त्यांची मुलगी आणि पुतण्या तिथेच हजर होते. त्यांनी सोडवासोडव केली. त्यानंतर देऊळगाव राजा पोलीस स्टेशन गाठले, आणि मुलगा डिगांबर याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. यावरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.