संतापजनक ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी एकटीच होती, अचानक घरात घुसून 'त्याने' नको ते केले! नांदुरा तालुक्यातील घटना..
Jul 18, 2024, 11:02 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी एकटी असल्याचे पाहून एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला. सोमवार १५ जुलैला ही घटना घडली. प्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीवरून, वासनांध युवका विरोधात नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सुरज विलास तायडे (२२ वर्ष )असे आरोपीचे नाव आहे. नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमवारी घरी एकटीच होती. दरम्यान, सुरज तायडे याने अचानक पिडीतेच्या घरात प्रवेश केला. अल्पवयीन पिडीतेचा विनयभंग करण्यास त्याने सुरुवात केली. यावेळी ती तीव्र विरोध करत होती. मुलीने जोरजोरात आरडाओरड केली. त्यांनतर सुरजने घरातून पळ काढला. आई, वडील घरी आल्यानंतर पिडीतेने सगळा प्रकार सांगितला. यांनतर तिघांनीही नांदुरा पोलीस स्टेशन गाठले. सुरज विलास तायडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू झाला. दरम्यान, त्याला पोलिसांनी अटकही केली असल्याची माहिती समोर आली आहे.