नांगरटी चे काम सुरू असताना घात झाला! ट्रॅक्टर उलटल्याने दबून चालकाचा मृत्यू; संग्रामपूर तालुक्यातील घटना...
Mar 27, 2026, 11:37 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतात नांगरटी मशागतचे काम करत असतांना ट्रॅक्टर उलटून गणेश अर्जुन मानखैर या २४ वर्षीय चालक युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी काकोडा येथे घडली.
Advt
चोंढी टाकळेश्वर शिवारातील गट नंबर २१ मध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर चालक गणेश अर्जुन मानखैर हा युवक ट्रॅक्टरद्वारे नांगरटीचे काम करत होता. ट्रॅक्टरचे वळण घेत असताना अचानक तोल सुटल्याने ट्रॅक्टर अवजारासह शेतातील ओसाड विहिरीत पलटी झाला.
या अपघातात गणेश हा ट्रॅक्टरखाली दबला गेला. घटनेची माहिती शेजारच्या शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालक युवकाला ट्रॅक्टरखालून बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी शेगांव रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र ट्रॅक्टरच्या ओझ्याने गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती शेगाव पोलिसांना मिळताच पंचनामा व शवविच्छेदन करून मृतदेह
नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शेगाव पोलिसात मर्ग दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत.