रेती तस्करांवर प्रशासनाचा ‘बुलडोझर’; चार बोटी उद्ध्वस्त, ५५ लाखांचा एवज नष्ट; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महसूल-पोलीसांची धमाकेबाज संयुक्त कारवाई !
सदर बोटींसह त्यावर काम करणाऱ्या तीन परप्रांतीय मजुरांना पोलीस विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर या सर्व बोटी सीनगाव जहागीर येथील जलाशय काठावर सुरक्षितरीत्या आणून महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ब्लास्टिंगद्वारे नष्ट करण्यात आल्या.
या संयुक्त कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, महसूल नायब तहसीलदार सायली जाधव, पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी, महिला पोलीस उपनिरीक्षक क्रांती ढाकणे, मंडळ अधिकारी विजय हिरवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मुळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकिसन गीते, अशोक सांगळे, विजय दराडे, प्रवीण डोईफोडे, सुरेश डोईफोडे, परमेश्वर बुरकुल, सुषमा रगडे, संतोष चेके, गजानन ठाकरे, सोळंकी, महसूल सेवक कविता शिरसाठ तसेच खडकपूर्णा प्रकल्प उपविभागाचे सुरक्षा कर्मचारी पुरुषोत्तम भागीले उपस्थित होते.
खडकपूर्णा जलाशय व नदीपात्रात अवैध रेती उत्खनन, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई यापुढेही अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी संजय खडसे व उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी दिला आहे.या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध रेती व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.