किराणा मॉलमध्ये चोरी करणारा आरोपी बोराखेडी पोलिसांच्या जाळ्यात; मॉलमध्ये चोरी करून गेला होता मध्यप्रदेशात; शेलापुर येथील घरफोडीचे आरोपी मात्र अजूनही मोकाट.!
Jul 11, 2025, 12:06 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बोराखेडी येथील मॉल मधून 90 हजार रुपये लंपास करणारा चोरट्याला बोराखेडी पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याला मध्यप्रदेश मधून ताब्यात घेण्यात आले. राजू आखाडे असे या चोरट्याचे नाव आहे. त्याला मोताळा न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठवली देण्यात आली.
बोराखेडी येथील सुभाष कुटे यांच्या माऊली किराणा मॉल चे दुकान फोडून त्यातील 90 हजार रुपये लंपास केल्याची घटना 27 जून रोजी उघडकीस आली होती. चोरटा हा सीसीटीव्हीत कैद झाला होता. या चोरट्याला बोरखेडी पोलिसांनी मध्य प्रदेश मधील नांदयातुपली जि.खरगोन मध्य प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला मोताळा येथील न्यायालयात हजर केले असता त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या चोरट्याला ताब्यात घेतली असले तरी मात्र शेलापूर खुर्द येथे 25 जून च्या एकाच रात्री दोन घर फोड्या करून 3 लाख 55 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणारे चोरटे मात्र अजूनही मोकाटच आहे. त्यांना पकडण्यात बोराखेडी पोलिसांना अजून यश आले नाही.