चिखलीत सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याची गाडी फोडली! पोलिस ठाण्यात तक्रार...गुन्हा दाखल 

 

 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीत सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसूफ खा बिस्मिल्ला ( रा. अंगूरचा मळा, चिखली) असे गाडी फोडणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 

मोहम्मद सुफयान हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. ते चिखली शहरातील अंगुरचा मळा, उमर फारुक मस्जिद जवळ राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी युसूफ खा बिस्मिल्ला हा त्यांच्या घराच्या पाठीमागे राहतो. आरोपी दारू पिण्याच्या सवयीचा असून मोहम्मद सुफयान यांना नेहमी कारण नसतांना शिवीगाळ करतो.
मोहम्मद सुफयान हे कौटुंबिक खाण्यासाठी मागील महिन्यात मुंबईला गेले होते. त्यावेळी आरोपी युसूफ खा याने दारूच्या नशेत मोहम्मद सुफयान यांच्या घरासमोर उभी असलेली स्विफ्ट डिझायर गाडी फोडली. मुंबईवरून आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी युसूफ खा बिस्मिल्ला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.