एका पॅन्ट वरून शेगावात झाला राडा! आठवण हॉटेलवर जेवतांना त्याला पॅन्ट आठवली अन्....
Apr 22, 2025, 11:30 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कधी कधी शुल्लक कारणावरून भला मोठा वाद होतो.. संत नगरी शेगावात आता अशाच एका मॅटर ची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या वादाच कारण चक्क एक पॅन्ट आहे.. पॅन्ट वरून मोठा राडा झाला, तिघांनी मिळून कापड दुकानदाराला एका हॉटेलवर मारहाण केली. कापड दुकानदारांनी या प्रकरणाची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरण असे आहे की शेगावातील रोहित चंद्रकांत पातूरकर (२६) यांचे रेस्ट हाऊस समोर आयकॉनिक रेडिमेड नावाचे कापड दुकान आहे. ६ फेब्रुवारीला त्यांच्या दुकानातून व्यंकटेश नगरातील हरीश पारखेडे याने शर्ट पॅन्ट खरेदी कले होते. साईज मध्ये बदल असल्यास दोन दिवसांत कपडे बदलून मिळतील असे त्यांच्यात बोलणे झाले होते. दरम्यान हरीश पारखेडे हा १५ दिवसानंतर पॅन्ट बदलायला दुकानात आला. मात्र दुकानदाराने पॅन्ट फाटली असल्याचे कारण सांगत पॅन्ट बदलून दिली नाही. हा राग हरीच्या मनात होता. २० एप्रिलच्या सकाळी ९ वाजता दुकानमालक रोहित हॉटेल आठवण येते जेवण करत होता. त्याचवेळी हरीश त्यांच्या मित्रांसह तिथे पोहोचला. पॅन्ट बदलून न देण्याचा राग त्याच्या मनात होताच, त्याच रागातून त्याने रोहितला मारहाण केली. तू पॅन्ट परत का घेत नाही आमचे पैसे काय फुकाचे आहे काय असे म्हणत त्याने शिवीगाळ केली, राम चव्हाण आणि निखिल पारखेडे या हरीश्यच्या मित्रांनी देखील रोहितला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तक्रारीवरून हरीश सह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.