प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्येचे प्रकरण! वैभवने प्रवीणला असे संपवले; रुमालाने तोंड दाबले अन्....
Jan 22, 2025, 12:27 IST
मलकापूर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) :मलकापूर येथे प्रेम प्रकरणातून बेलाड येथील तरुणाची त्याच्या मित्रानेच हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या तरुणाची हत्या ही रुमालाने तोंड दाबून केल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तपासाकरिता आणखी दोन दिवसाची पोलीस कोठडी नाल्याकडे मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने दोन आणखी दिवस आरोपीच्या कोठडीत वाढ केली आहे.
आरोपी वैभव सोनार याला १७ जानेवारी रोजी २१ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आरोपीचे बयाण आणि वैद्यकीय अहवाल दोन्ही बाजूंनी तपास सुरू झाला. जानेवारी १७ रोजी रात्री ८ वाजता दफन केलेल्या मृतदेहाला जमिनीतून बाहेर काढण्यात आला. तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार राहुल तायडे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात आले. त्याचे छायाचित्रणही करण्यात आले. त्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये तरुणाची हत्या रुमालाने तोंड दाबूनच झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अटकेत आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.