दोस्त दोस्त ना रहा... विश्वासघाताची गजब कहाणी! बातमी वाचून तुम्ही म्हणाल विश्वास कुणावर ठेवावा? माळवंडीच्या पवन चव्हाणने केला विश्वासघात.....नेमका प्रकार काय..वाचा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हो... बातमीच शीर्षक जे वाचलय ते अगदी खरं आहे...विश्वासघात कशाला म्हणतात याचा नमुना या बातमीत आहे...बुलडाणा तालुक्यातील माळवंडी येथील अक्षय चव्हाण यांच्यासोबत जो प्रकार घडला तो धक्कादायक आहे..विशेष म्हणजे अक्षय सोबत ज्यांनी विश्वासघात केला तो अक्षयचा मित्रच आहे...मात्र आता घडलेल्या प्रकारानंतर दोस्त दोस्त ना रहा असे म्हणण्याची वेळ अक्षयवर आली आहे...याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात पवन चव्हाण विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
                       जाहिरात 👆
आईला उपचारासाठी दवाखान्यात न्यायचे असे सांगून ७ जानेवारीला बुलडाण्याच्या धाड नाका परिसरातून पवन चव्हाण याने मित्र अक्षयची चारचाकी (स्विफ्ट डिझायर)नेली. मात्र अजूनही तो परतला नाही. माळवंडी गावचे संजय चव्हाण कुटुंबीयांसोबत आपल्या नातेवाईकाकडे बुलडाण्यात आले होते. त्यांचे नातेवाईक जगन्नाथ कड धाड नाका परिसरात राहतात. रात्री ८ वाजता संजय चव्हाण यांच्या मुलाला(अक्षयला) माळवांडीच्या पवण चव्हानचा फोन आला. आईला उपचारासाठी दवाखान्यात न्यायचे आहे. तुझी गाडी दे , असे तो म्हणाला. त्यावर मी शेगावला आहे गाडी मावशीच्या घरी (धाड नाका) येथे आहे. तेथून चाबी घे असे अक्षयने पवनला सांगितले. त्यांनतर पवन गाडी घेऊन गेला तर अजूनही परतला नाही. सध्या पवनचा फोन बंद येत आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच अक्षयच्या वडिलांनी, संजय चव्हाण यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रवींद्र हजारे करत आहेत.