खामगावात कागदपत्रांवरून दोन कुटुंबात वाद पेटला! दणादण मारामारी...चाकू चालला!१२ जणांविरुद्ध गुन्हा... समर्थ नगरातील घटना
Jun 5, 2026, 07:21 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावच्या समर्थनगरात कागदपत्रांच्या वादातून दोन कुटुंबात वादावादी झाली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले..घरात घुसून , लाथा बुक्का तसेच चाकूने वार केल्याच्या तक्रारी दाखल झाल्यात. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्याने खामगाव शहर पोलीस ठाण्यात एकूण १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जूनच्या रात्री आठ वाजता ही घटना घडली. समर्थ नगर गजानन कॉलनीत झालेल्या या राड्याच्या वेळी बघ्यांची गर्दी जमली होती. एका तक्रारीनुसार सुलभा देविदास गवई या कुटुंबासह घरी असताना विजय गवई गोपाल मोरे प्रदीप मोरे संगीता मोरे व दीपक गवई यांनी संगनमत करून सुलभा गवईंच्या घरात प्रवेश केला.
कागदपत्रांच्या चोरीचा आरोप करीत शिवीगाळ करून सुलभा गवईंच्या मुलाला मारहाण करण्यात आली. दोघांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केल्याचा आरोप ही तक्रारीत करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूनेही तक्रार दाखल झाली असून त्यांनीही मारहाण झाल्याचा दावा केलाय. दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करत आहेत..