नळावर पाणी भरायला गेलेल्या दिव्यांग तरुणीवर बलात्कार केला; तरुणीच्या आईने आरोपीला रंगेहाथ पकडले! 

आता भोगावी लागणार पापाची फळे;संग्रामपूर तालुक्यातील घटना...
 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नळावर पाणी भरायला गेलेल्या दिव्यांग तरुणीवर त्याची पापी नजर पडली..कसेही करून तिला वासनेची शिकार बनवायचेच असे वासनांध तरुणाने ठरवले..या खेपेला तिची आई तिच्यासोबत नव्हती, ती संधी त्याने हेरली.. भरदुपारची वेळ तरी त्याला कसलीही भीती वाटली नाही..नराधमाने तिला शौचालयात नेले, तिथे तिच्या शरीराचे लचके तोडले..बराच वेळ होऊनही मुलगी न परल्याने तिला शोधण्यासाठी आई नळाच्या दिशेने गेले..तिथल्या एका शौचालयातून मुलीच्या रडण्याचा आवाज आला, त्या दिशेने गेल्यावर नराधम आरोपी मुलीवर बलात्कार करीत असल्याचे दिसले..तिथेच मुलीच्या आईने आरोपीच्या कानाखाली वाजवली, लाथाबुक्क्यांनी बेदम हाणले..मात्र सामूहिक मार बसण्याच्या आधीच त्याने तिथून पळ काढला..संग्रामपूर तालुक्यातील एका गावात ही घटना घडली होती..आता मात्र न्यायदेवतेच्या मंदिरातून आरोपीला पळून जाता आले नाही..
सोपान गजानन रसाळे (३४, रा. काकणवाडा, ता.संग्रामपूर) असे आरोपीचे नाव आहे. घटना २०२० च्या दिवाळीची आहे. १४ नोव्हेंबर २०२० ला सगळीकडे संध्याकाळच्या पूजेची तयारी सुरू होती. संग्रामपूर तालुक्यातील एका गावात विकृत सोपानच्या डोक्यात भलतेच पाप सुरू होते. २१ वर्षीय दिव्यांग तरुणीवर त्याने शौचालयात नेऊन बलात्कार केला, मुलीच्या आईने रंगेहाथ पकडल्यावर त्याने बेदम मार खाल्ला..मात्र गावातील लोकांच्या तावडीत सापडलो तर काही खरे नाही म्हणून त्याने तिथून कसाबसा पळ काढला.
मुलीच्या आईने तातडीने तामगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयात एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. आरोपी सोपान वरील दोष सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक २ खामगावचे न्यायाधीश पी.पी. कुळकर्णी यांनी आरोपीला १० वर्षे सश्रम करावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, दंड न भरल्यास अतिरिक्त ४ महिन्यांचा कारावास सुनावला. विशेष म्हणजे दंडाच्या रकमेतील २० हजार रुपयांची रक्कम पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.