चिखलीत ३५ वर्षीय महिलेला घरात डांबून मारहाण! आता भोगावी लागणार कर्माची फळे, आरोपी दिलीप जयस्वालला २ वर्ष ६ महिने सक्तमजुरी!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३५ वर्षीय पिडीत महिलेला घरात डांबून मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला २ वर्ष ६ महिने सक्तमजूरीची शिक्षा व २१ हजार रू.दंड अशी शिक्षा मा. न्यायाधीश विशेष न्यायालय. श्री.आर.एन. मेहरे यांनी आज २४ मे, रोजी सुनावली.
घटना २०१९ मध्ये चिखलीतील पुंडलिक नगर येथे घडली होती. यातील आरोपी दिलीप हरिकिसन जयस्वाल याच्या विरोधात ३५ वर्षीय पिडीतेने २५ सप्टेंबर २०१९ रोजी तक्रार दिली, तकारीवरून त्याच्या विरोधात विविध कलमान्वये तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दिलीप जयस्वाल याने पिडीतेला त्याच्या राहते घरी पुंडलिक नगर येथे बोलावून वेळोवेळी मुला मुलींचा सांभाळ करेल, व तुझ्या मुलीचे लग्न मी लावून देईल असे आमिष दाखवून पिडीतेवर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर २४ सप्टेंबर २०१९ रोजी संध्याकाळी पिडीतेला घरी बोलावून घरात डांबून ठेवले व घरामध्ये कोंडून तिचे सोबत वाद घातला. इतकेच नाही तर, फावड्याच्या दांडयाने पाठीवर डोक्यावर व दोन्ही हातावर मारहाण केली. अशी तक्रार पिडीतेने चिखली पोलिसांत दिली होती. तक्रारीवरून आरोपी दिलीप जयस्वाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केला, दरम्यान पुरावा मिळाल्यानतर आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. 
दोषारोपपत्र दाखल झाल्यानतर सत्र खटला पुराव्याकामी लागल्यानंतर आरोपी विरुध्द दोषसिध्द होण्याच्या दुष्टीकोणातुन जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मणराव भटकर यांनी ७ साक्षीदार तपासले त्यापैकी पिडीता, घटनास्थळ व जप्ती पंच, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची राहिली. विशेष बाब म्हणजे सदर सत्र खटल्यामध्ये सर्व साक्षीदाराने सरकार पक्षास मदत केली. व पिडीतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
परंतु याप्रकरणी पिडीतेने आरोपीसोबत संमतीने शारिरीक सबंध ठेवले होते. ही बाब वि. न्यायालयाचे निदर्शनास आल्यामुळे आरोपीला वि. न्यायालयाने आरोपीला निर्दोष मुक्त केले आहे. तर भा.दं.विचे कलम ३२४ व ३४२ नुसार दोषी ठरवून भा.दं.विचे कलम ३२४ नुसार २ वर्ष सक्त मजूरी व वीस हजर रुपये दंड तर भा.दं.वि चे कलम ३४२ नुसार ६ महिने सक्त मजूरी व एक हजार दंड वरील दोन्ही दंड न भरल्यास ३ महिने व एक महिना साध्या कारावासाची शिक्षा अशा प्रकारची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल श्री. वसंत लक्ष्मण भटकर यांनी आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीकोनातून प्रभावी युक्तीवाद केला. सर्व शिक्षा आरोपीस एकत्रीत भोगावयाचे आहेत तर सदरचा खटला यशस्वी होण्यासाठी पो.नि. सचिन चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते तसेच कोर्ट पैरवी पो.हे.कॉ. श्री. नंदाराम इंगळे व श्री. अशोक गायकवाड यांनी सहकार्य केले.