३१ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू; मोताळा येथील घटना..!

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विहिरीत बुडून ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मोताळा येथील आठवडा बाजार येथील स्वप्निल मुकुंदा भारंबे असे या तरुणाचे नाव आहे.
२७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मी बाहेर जात आहे. थोड्या वेळाने घरी परत येतो असे आईला सांगून स्वप्नील निघून गेला. त्यानंतर स्वप्निलहा घरी न आल्यामुळे त्याचे चुलतभाऊ आशुतोष उद्धव भारंबे व नातेवाईकांनी त्याचा मोताळा गावाचे परिसरात आजूबाजूला तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता स्वप्नील मिळून आला नाही. २८ जुलै रोजी हरविल्याबाबत  बोराखेडी पोलीस स्टेशन मध्ये  हरविल्याची नोंद आहे होती. २९ जुलै रोजी सकाळ पासून परत स्वप्नीलचा चुलत भाऊ आशुतोष व नातेवाईक मंडळी हे स्वप्निलचा शोध घेत असताना स्वप्निल हा शेख कयूम यांचे शेतातील विहिरीत मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना प्रेत दिसून आले.


 स्वप्नीलचा चुलत भाऊ आशुतोष यांनी पोलीस स्टेशनला ताबडतोब माहिती दिल्याने घटनेची नोंद करुन त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. लोकांचे मदतीने प्रेत विहिरीबाहेर काढले. प्रेतावर मरणोत्तर पंचनामा करून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पोस्टमार्टमसाठी पाठविले होते.