२३ वर्षाच्या तरुणाने गोठ्यात जाऊन गळफास घेतला! मुलाचा लटकलेला मृतदेह पाहून कुटुंबीयांचा आर्त आक्रोश; वर्दडी हळहळले.
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी बु येथिल २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. गोठ्यातील लोखंडी अँगलला तरुणाने गळफास घेतला. अशोक कलाजी लिपने असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
वर्दडी बु सोनोशी रस्त्यावर अशोकचा गोठा आहे. अशोकचे वडील कलाजी लिपने यांनी८ ऑगस्टच्या रात्री कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास बैलांना चारा टाकण्यासाठी ते गोठ्यावर गेले. यावेळी समोरील दृश्य पाहून त्यांना हादराच बसला. त्यांचा मुलगा अशोक गोठ्यातील अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसुन आला. मुलाना त्या अवस्थेत बघितल्याने त्यांनी हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याच्या आवाज ऐकून अशोक दहातोंडे, नंदलाल आटोळे, विनायक काकडे, संजय लिपने यांनी गोठ्याकडे धाव घेतली. अशोकच्या गळ्यातील दोर सोडून त्याला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहीकेतून सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अशोकला मृत घोषीत केले.
या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अशोकने आत्महत्या का केली? हे मात्र अद्याप समोर आले नाही. अशोकच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध पोलीस घेणार आहेत. प्रकरणाचा तपास ठाणेदार वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शरद ठोंबरे, रमेश गोरे, सलिम परसुवाले, सुभाष गिते हे करीत आहेत.