उंदीर मारण्याचे औषध घेऊन पंचविशीतल्या तरुणाची आत्महत्या! जानेफळात हळहळ..!!

 
जानेफळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उंदीर मारण्याचे औषध घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे समोर आली आहे. वैभव सुभाष खरात(२५, रा.जानेफळ, ता. मेहकर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार वैभव अविवाहित होता. परिसरात इलेक्ट्रिक फिटिंगचे तो काम करत होता. शनिवारी त्याने उंदीर मारण्याचे औषध खाल्ले होते. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला मेहकर येथे भरती करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बुलडाणा रेफर करण्यात आले.  बुलडाणा येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र औषध मोठ्या प्रमाणावर खाल्ल्याने त्याची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. आज १८ जुलैच्या पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.