प्रामाणिक बेवडा चोर! व्यसनापायी धाडस केले, मेन रोड वरील वाईन शॉप फोडले ,पण चोरली एकच बॉटल! बुलडाणा शहरातील घटना!

 
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरात चोरट्यानी १९ जुलैच्या रात्री हैदोस घातला अन  मुख्य मार्गावरील २ व्यापार संकुलातील दुकाने फोडून हजारोचा ऐवज लंपास केला. मात्र एका बहाद्दर चोरट्याने दारूच्या दुकानातून केलेली केवळ एका बॉटलची चोरी आज दिवसभर खमंग चर्चेचा विषय ठरला.
 

संगम चौक जवळच असलेल्या वाईन शॉपचे शटर तोडून १९ जुलैच्या मध्यरात्री   एका अज्ञात चोरट्याने  दुकानामध्ये प्रवेश केला. मात्र उंची दारू वा मोठा हात मारण्याऐवजी त्याने फक्त आपल्या गरजेपुरते  फक्त एकच बियरची बॉटल  चोरली. आज २० जुलैला सकाळी दुकानचे कर्मचारी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना शटर वाकलेले दिसून आलें. त्यामुळे आत जाऊन त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात सदर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या वाईन शॉपमध्ये लाखो रुपयाच्या उच्च प्रतिची दारू, वाईन, बिअर होत्या. 

भगवती कॉम्प्लेक्स मधील ३ दुकाने फोडली
 
१९ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्याने जयस्तंभ चौक जवळील  भागवती कॉम्प्लेक्स मधील ३ दुकानांचे शटर वाकवून हजारो रुपयांचा एवज  चोरून नेला आहे.  भगवती कॉम्प्लेक्स मधील नवरंग जनरल स्टोअर्स, शंकर बूक डेपो व लाठे किराणा ही ३ दुकाने रात्री २ वाजताच्या सुमारास फोडली आहे.या तीन दुकानातुन रोख रक्कम लंपास केली. तपास बुलडाणा शहर पोलिस करीत आहेत.