खळबळजनक! बुलडाणा अर्बनच्या भाईजी चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेतींना किडनॅप करण्याचा होता तिघांचा प्लॅन! दिल्लीतून आयबीने उचलले
मिर्झा आवेज बेग(२१) शेख साकीब शेख अन्वर(२०)उबेद खान शेर खान(२०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते बुलडाणा शहरातील शेर -ए -अली चौकातील राहणारे आहेत. तिघेही काही दिवसांआधी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला. बँक लुटण्यासाठी त्यांनी एक एअर गन विकत घेतली.
बँक लुटल्यानंतर कार खरेदी करायची, ऑफिस बनवायचे आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तीला किडनॅप करून कोट्यवधी रुपये कमवायचे असा प्लॅन त्यांचा होता. दरम्यान दिल्लीत आयबी पोलिसांनी संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेतले. बुलडाणा पोलिसांना या प्रकरणाची माहिती देऊन त्यांना बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशी दरम्यान भाईजी चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांना किडनॅप करण्याचा त्यांचा प्लॅन होता असे त्यांनी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तिघांविरुद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.