जिल्ह्यात उद्या ड्राय रन! आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट मोडवर!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालू महिन्याअखेर मुहूर्त ठरू शकणार्या कोरोना लसीकरणातील महत्त्वाचा व निर्णायक टप्पा असलेल्या ड्राय रन अर्थात रंगीत तालीमचे जिल्ह्यात उद्या, 8 जानेवारीच्या मुहूर्तावर आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट मोडवर असल्याचे चित्र आहे. ड्राय रनसाठी 4 केंद्रं निवडण्यात आली आहेत. …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालू महिन्याअखेर मुहूर्त ठरू शकणार्‍या कोरोना लसीकरणातील महत्त्वाचा व निर्णायक टप्पा असलेल्या ड्राय रन अर्थात रंगीत तालीमचे जिल्ह्यात उद्या, 8 जानेवारीच्या मुहूर्तावर आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट मोडवर असल्याचे चित्र आहे.

ड्राय रनसाठी 4 केंद्रं निवडण्यात आली आहेत. यामध्ये बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव आणि सोनाळा पीएचसी यांचा समावेश आहे. या ड्राय रनमध्ये प्रत्यक्ष लसीकरणाची पूर्व तयारी करून घेण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले. ही व्हॅक्सिन कोणाकोणाला क्रमाक्रमाने द्यायची याची माहिती देण्यात येणार आहे. या 4 केंद्रांवर प्रत्येकी 25 ते 30 आरोग्य कर्मचारी नेमण्यात येणार असून, 5 तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रावर प्रतीक्षालाय, लसीकरण केंद्र व निरीक्षणासाठी अशा 3 खोल्या उभारण्यात येणार आहेत. मात्र यावेळी प्रत्यक्ष लस देण्यात येणार नसून, प्रात्यक्षिके करून घेण्यात येणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले.