कोरोनाने 2 पुरुषांचा मृत्यू; जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा 43 हजार पार
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 7 एप्रिलला कोरोनाने दोघांचे बळी घेतले. उपचारादरम्यान सारोळा मारोती (ता. मोताळा) येथील 65 वर्षीय पुरुष व गांधीनगर मलकापूर येथील 74 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात नव्या 626 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, 792 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5465 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4839 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 626 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 325 व रॅपिड टेस्टमधील 301 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 585 तर रॅपिड टेस्टमधील 4254 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर व तालुका :126, मोताळा शहर व तालुका : 29, खामगाव शहर व तालुका : 53, शेगाव शहर व तालुका :4, चिखली शहर व तालुका : 34, मलकापूर शहर व तालुका : 68, देऊळगाव राजा शहर व तालुका : 37, सिंदखेड राजा शहर व तालुका : 12, मेहकर शहर व तालुका : 97, संग्रामपूर शहर व तालुका : 22, जळगाव जामोद शहर व तालुका : 3, नांदुरा शहर व तालुका : 71, लोणार शहर व तालुका : 70 संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 626 रूग्ण आढळले आहे.
5685 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 249416 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 37245 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 3435 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 43221 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 5685 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 291 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.