एकट्या बुलडाणा शहरात 13, जिल्ह्यात आढळले 57 नवे कोरोनाबाधित!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 3 फेब्रुवारीला 57 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून, यात एकट्या बुलडाणा शहरातील 13 आणि खामगाव शहरातील 12 बाधितांचा समावेश आहे. या दोन्ही शहरांत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत असल्याने शहरवासियांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 669 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 612 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 57 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 53 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 452 तर रॅपिड टेस्टमधील 160 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
चिखली तालुका : अमडापूर 1, काठोडा 1, वैरागड 1, सावरगाव डुकरे 1, चिखली शहर : 6, बुलडाणा शहर : 13, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 1, धामणदरी 1, मौंढाळा 1, चांडोळ 1, कुंबेफळ 7, शेगाव तालुका : पळशी 1, शेगाव शहर : 4, मलकापूर तालुका : उमाळी 2, खामगाव शहर : 12, देऊळगाव राजा शहर : 4, खामगाव तालुका : पिंपळगाव राजा 2
57 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 57 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 31, चिखली : 5, देऊळगाव राजा : 1, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 10, अपंग विद्यालय 1, मलकापूर : 3, लोणार : 2, दे. राजा : 4
332 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 110816 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13611 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 753 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14113 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 332 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 170 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.