आईस्क्रीम, मिर्ची, कोबी, कुकर, बिस्कीट, केक ते लॅपटॉप...ही खरेदीच्या वस्तूंची यादी नव्हे , तर आहेत लोकसभा लढणाऱ्या अपक्ष उमेदवारांची चिन्हे!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय! ही मॉल किंवा बाजारात खरेदीसाठी जातानाची यादी नक्कीच नाही! वस्तूंच्या यादीवरून तसे वाटत असले तरी ही यादी वेगळीच आहे...
याचे कारण ही यादी आहे ती लोकसभा स्वबळावर लढणाऱ्या अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांची!प्रसाशकीय किंवा निवडणूक विभागाच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'मुक्त निवडणूक चिन्हांची '!अपक्षांना यातील कोणतेही चिन्ह आपले निवडणूक चिन्ह म्हणून निवडता येईल.
                   (    जाहिरात 👆.   )
रिंगणातील अपक्षांसाठी यंदा निवडणूक आयोगाने पाचपन्नास नव्हे तब्बल १९० मुक्त चिन्हे( फ्री सिम्बॉल) उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये आबालवृद्धांच्या पसंतीच्या बिस्कीट, केक, आईस्क्रीम, शिमला मिरची, बॅट, बॅटमन, डबल रोटी, मटर चाही समावेश आहे. याशिवाय रोजच्या वापरातील कोट, एअर कंडिशनर, फ्रीज, टॉर्च, ब्रेड रोस्टर, अलमारी, ब्रिफकेस, साखळी, शिलाई मशीन, गॅस सिलिंडर, कचरापेटी, बादली, लंच बॉक्स, कुकर, अंगठी, बेल्ट, सायकल पंप, फ्रॉक, लायटर, सारख्या वस्तू देखील निवडणूक चिन्ह म्हणून निवडता येतील.
                          (    जाहिरात 👆.   )
क्रीडा प्रेमी अपक्ष उमेदवारासाठी बॅट, फलंदाज, फुटबॉल खेळाडू, हॉकी व चेंडू ही चिन्हे, संगीत प्रेमींसाठी बासुरी, हार्मोनियम(पेटी), ग्रामोफोन, रंगील्या मंडळीसाठी काचेचा ग्लास, व्यावसायिक असाल तर हिरा, अंगठी, रोड रोलर, विज खांब, क्रेन, पेट्रोल पंप हे चिन्ह दिमतीला आहे.  अपक्ष युवा किंवा आधुनिक असला तर त्यासाठी लॅपटॉप, कॅलकुलेटर, रिमोट, रोबोट, सीसीटीव्ही, संगणक, हेल्मेट, चार्जर, अशी आधुनिक काळाशी सुसंगत चिन्हे सुद्धा उपलब्ध आहेत.