Corona Update : धक्कादायक! कोरोनाचे 7 बळी!!; घाटाखाली परिस्थिती भयंकर!! जिल्ह्यात बाधितांचा आकडा 24 हजार पार; बळी @ 215
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या घाटावर थैमान घालणाऱ्या कोरोनाने वक्रदृष्टी आता घाटाखालील भागाकडे वळवली असून, आज, 12 मार्चला 7 बळी घेतले आहेत. यात उपचारादरम्यान मोताळा तालुक्यातील माकोडी (ता. मोताळा) येथील 76 वर्षीय महिला व राजूर येथील 73 वर्षीय पुरुष, खामगावच्या निळकंठनगरातील 83 वर्षीय पुरुष, पटवारी कॉलनीतील 65 वर्षीय पुरुष आणि नाथ प्लॉट भागातील 65 वर्षीय महिला, नांदुऱ्याच्या वॉर्ड 11 येथील 74 वर्षीय पुरुष, धोत्रा नाईक (ता. चिखली) येथील 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 567 नव्या बाधितांची भर पडली असून, 561 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1760 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1177 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 567 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 488 व रॅपिड टेस्टमधील 79 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 749 तर रॅपिड टेस्टमधील 428 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 78, बुलडाणा तालुका : नांद्राकोळी 1, सुंदरखेड 4, पांगरी 1, पिंपळगाव सराई 1, साखळी खुर्द 1, माळवंडी 1, भादोला 11, केसापूर 1, दत्तपूर 2, बिरसिंगपूर 1, घाटनांद्रा 1, खेर्डी 1, येळगाव 1, खामगाव शहर : 35, खामगाव तालुका : पिंपरी गवळी 1, पिंप्राळा 2, कदमापूर 1, सुटाळा 1, शहापूर 2, गणेशपूर 4, नागापूर 1, टेंभुर्णा 21, लाखनवाडा 1, नांदुरा तालुका : निमगाव 5, वडनेर 1, आमसरी 1, धानोरा 1, मोमिनाबाद 1, खडतगाव 1, शेलगाव मुकुंद 2, फुली 2, मलकापूर शहर : 84, मलकापूर तालुका : निमखेड 1, लोणवडी 1, जांभूळ धाबा 1, दाताळा 1, चिखली शहर : 37, चिखली तालुका : खंडाळा 1, वरूड 2, मेरा खुर्द 1, केळवद 1, मलगी 1, शेलूद 1, सवणा 1, दिवठणा 1, भोकरवाडी 2, कटोडा 1, हातणी 1, माळशेंबा 1, पळसखेड जयंती 1, सिंदखेड राजा शहर : 10, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 8, पिंपरखेड 9, दुसरबीड 4, हिवरखेड पूर्णा 7, आडगाव राजा 1, राहेरी खुर्द 1, मोताळा तालुका : कोथळी 12, धामणगाव बढे 2, आडविहिर 1 पोफळी 1, राजूर 1, बोराखेडी 1, पिंपळगाव गवळी 2, किन्होळा 7, गिरोली 1, रामगाव 1, कु्ऱ्हा1, मोताळा शहर : 3, शेगाव शहर : 65, शेगाव तालुका : चिंचोली 2, गौलखेड 1, खेर्डा 2, हिंगणा 3, चिंचखेड 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, वरवट बकाल 2, शेवगा 1, पातुर्डा 2, जळगाव जामोद शहर : 18, जळगाव जामोद तालुका : कुरणगड बुद्रूक 1, पिंपळगाव काळे 2, धानोरा 2, देऊळगाव राजा शहर : 21, देऊळगाव राजा तालुका : आळंद 1, पिंपळगाव चि. 1, हिवरखेड 4, अंभोरा 1, अंढेरा 1, चिंचोली बुरुकुल 6, मेहुणा राजा 2, लोणार शहर : 5, लोणार तालुका : सरस्वती 1, हिरडव 2, मेहकर शहर :1, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 3, नांदुरा शहर : 12, मूळ पत्ता जालना 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 567 रुग्ण आढळले आहे.
561 रुग्णांची कोरोनावर मात
आज 561 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 79, कोविड हॉस्पिटल 22, शेगाव : 67, खामगाव : 48, नांदुरा : 55, देऊळगाव राजा : 22, चिखली : 29, मेहकर : 31, लोणार : 2, जळगाव जामोद : 22, सिंदखेड राजा : 41, मलकापूर : 32, संग्रामपूर : 46, मोताळा : 54.
3469 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 156748 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 20423 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2286 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 24107 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 3469 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 215 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.