Corona Update : कोरोनाचे नवे २ पॉझिटिव्‍ह!; २ जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 5 सप्टेंबरला कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळले असून, दोघे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 90 रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 955 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 953 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 5 सप्‍टेंबरला कोरोनाचे दोन नवे रुग्‍ण आढळले असून, दोघे बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या 90 रुग्‍ण रुग्‍णालयांत उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 955 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 953 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 2 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 273 तर रॅपिड टेस्टमधील 680 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा शहर : शिंगणेनगर 1, शेगाव तालुका : माटरगाव 1

एकूण बाधितांचा आकडा 87475 वर
आजपर्यंत 697845 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86712 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1050 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87475 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 90 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 673 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.