खळबळजनक! बेराळा फाट्यावर शिवभोजन कंपनीत कामगाराचा खून! तिघे पोलिसांच्या ताब्यात!
Aug 16, 2022, 19:50 IST
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेचे जेवण बनविणाऱ्या कंपनीत एका कामगाराचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मृतक कामगार हा पश्चिम बंगाल राज्यातील राहणारा असून पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलेले तिघेही परप्रांतीय आहेत.
मोहम्मद हुसेन(३४) असे मृतक कामगाराचे नाव आहे. चिखली तालुक्यातील बेराळा फाट्यावरील कामगारांसाठी मध्यान्ह भोजन बनविणाऱ्या कंपनीत तो कामगार होता. या कंपनीत जवळपास १०० ते १५० परप्रांतीय कामगार काम करतात. आज १६ ऑगस्ट रोजी मृतक मोहम्मद हुसेन याचा त्याच्या साथीदारांशी शुल्लक कारणावरून वाद झाला. त्या कारणावरून तिघांनी मिळून मोहम्मद हुसेन याला बेदम मारले. गंभीर अवस्थेत त्याला चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चिखली पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.