8 दिवसांतच 825 पॉझिटिव्ह! रुग्णांची दिवसाकाठी सरासरी 103!!; ‘ती’ 5 शहरे कंटेन्मेंट झोन मध्ये का? याचे उत्तर!!

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुमारे 1 वर्षापासून कोरोनाला तोंड देणाऱ्या जिल्हावासीयांसाठी प्रामुख्याने नागरी भागासाठी कंटेन्मेंट झोन म्हणजे नवीन नाही. यामध्ये पॉझिटिव्ह पेशंटच्या भागाला सील करण्यात येत होते. मात्र संपूर्ण शहरच कंटेन्मेंट घोषित होण्याची घडामोड केवळ अभूतपूर्वच म्हणावी अशी आहे. यामध्ये जिल्ह्यातील ‘त्या’ 5 नागरी भागाचीच निवड का? याचे उत्तर बातमीच्या …
 

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सुमारे 1 वर्षापासून कोरोनाला तोंड देणाऱ्या जिल्हावासीयांसाठी प्रामुख्याने नागरी भागासाठी कंटेन्मेंट झोन म्हणजे नवीन नाही. यामध्ये पॉझिटिव्ह पेशंटच्या भागाला सील करण्यात येत होते. मात्र संपूर्ण शहरच कंटेन्मेंट घोषित होण्याची घडामोड केवळ अभूतपूर्वच म्हणावी अशी आहे. यामध्ये जिल्ह्यातील ‘त्या’ 5 नागरी भागाचीच निवड का? याचे उत्तर बातमीच्या शीर्षकात दडले आहे.
21 फेब्रुवारीला विभागीय आयुक्तांच्या निर्देशावरून जिल्ह्यात मिनी लॉक डाऊनसह मर्यादित संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवशी एक दोन नव्हे तब्बल 5 नगरे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली. यामुळे हा निर्णय जितका धक्कादायक तेवढाच सर्व समाजघटकांना विचारात पाडणारा ठरला. मात्र ज्या वेगाने या 5 नगरांत कोरोना रुग्ण वाढले व वाढताहेत ते पाहता प्रशासनाकडे सध्यातरी दुसरा इलाज नव्हता, असे म्हणता येईल. कारण केवळ गत 8 दिवसांचा आढावा घेतला तर या 5 शहरांत मिळून तब्बल 825 कोरोना रुग्ण आढळले आहेत. म्हणजे या 5 ठिकाणी रोज सरासरी 103 रुग्ण येताहेत. गत्‌ 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान आलेल्या या आकड्यामुळे या 5 शहरांत कोरोनाचा वाढता उद्रेक व धोका दाखविणारा आहे. बुलडाणा शहराची ही सरासरी 30 रुग्ण, चिखलीची 28, खामगाव शहराची 17, देऊळगाव राजाची 15 तर मलकापूर ची 13 इतकी आहे. यामुळे केवळ 8 दिवसांत या 5 शहरांची रुग्ण संख्या 825 पर्यंत गेल्याने ती कंटेन्मेंट झोन ठरली आहे. आता 1 मार्चनंतर मोकळे व्हायचे की असेच राहायचे याचा निर्णय या 5 नगरांतील नागरिकांनी घ्यायचा आहे. निर्णय म्हणजे काही मोठी बाब नाही. कामाशिवाय बाहेर पडायचे नाही. पडलेच तर हिरोगिरी न करता नाक तोंड झाकणारे मास्क, स्वच्छ रुमाल घालणे, सामाजिक अंतर पाळणे, कुटुंबाबरोबर समाजाची काळजी घेणे एवढंच करायचे !