3 बळी, बाधितांचा एकूण आकडा 28 हजारांच्या टप्प्यात!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 28 हजारांच्या टप्प्यात आली आहे. आज, 18 मार्चला 885 बाधितांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या 27805 वर गेली आहे. 433 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, 3 बाधितांचा उपचारादरम्यान मत्यू झाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 6096 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 5193 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 885 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 435 व रॅपीड टेस्टमधील 450 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 655 तर रॅपिड टेस्टमधील 4538 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर व तालुका : 119, खामगाव शहर व तालुका : 129, शेगाव शहर व तालुका : 31, देऊळगाव राजा तालुका व शहर : 85, चिखली शहर व तालुका : 51, मेहकर शहर व तालुका : 10, मलकापूर शहर व तालुका : 124, नांदुरा शहर व तालुका : 85, लोणार शहर व तालुका : 26, मोताळा शहर व तालुका : 32, जळगाव जामोद शहर व तालुका : 87, सिंदखेड राजा शहर व तालुका : 92 आणि संग्रामपूर शहर व तालुका : 14 अशाप्रकारे जिल्ह्यात 885 रुग्ण आढळले आहेत.
433 रुग्णांना डिस्चार्ज
विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरमधून 433 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 172451 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 23116 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.
4460 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 172451 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 27805 कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी 23116 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 4460 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 229 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.