“आरटीई’च्‍या जिल्ह्यात अजूनही ६५८ जागा रिक्‍त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील २१४२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र एकदा मुदतवाढ देऊनही पालकांनी या प्रवेशांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत असून, अजूनही ६५८ जागा रिक्त आहेत. “आरटीई’च्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील २३१ शाळांनी नोंदणी केली आहे. आजपर्यंत १४८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील २१४२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र एकदा मुदतवाढ देऊनही पालकांनी या प्रवेशांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत असून, अजूनही ६५८ जागा रिक्‍त आहेत. “आरटीई’च्‍या २५ टक्‍के प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील २३१ शाळांनी नोंदणी केली आहे. आजपर्यंत १४८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. कोरोनामुळे या प्रक्रियेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.