हतेडीत महिलांचा संताप अनावर; पाण्यासाठी वाचा काय केले…
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हतेडी (ता. बुलडाणा) येथे पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. महिना महिना नळ येत नाहीत. त्यामुळे महिलांनी आज, 26 मार्चला ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हतेडीत भीषण पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. गावात पाणी पुरवठ्यासाठी जलस्वराज्य योजनेचे कामही झाले आहे. मात्र तरीही एक एक महिना नळ येत नाही. …
Mar 26, 2021, 17:54 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हतेडी (ता. बुलडाणा) येथे पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. महिना महिना नळ येत नाहीत. त्यामुळे महिलांनी आज, 26 मार्चला ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हतेडीत भीषण पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. गावात पाणी पुरवठ्यासाठी जलस्वराज्य योजनेचे कामही झाले आहे. मात्र तरीही एक एक महिना नळ येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते. आज संतप्त महिलांनी रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले.