सिंदखेड राजा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काल, १६ ऑक्टोबर रोजी रात्रीपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज, १७ ऑक्टोबरला नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. …
Oct 17, 2021, 21:34 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात काल, १६ ऑक्टोबर रोजी रात्रीपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज, १७ ऑक्टोबरला नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. राजेगाव परिसरातील नुकसान झालेल्या भागाची पाहणीही डॉ. शिंगणे यांनी केली. यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.