रुग्णांत घट तरीही 385 पॉझिटिव्ह! बाधित होण्याचे प्रमाण धोकादायक पातळीवर!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः मागील 2 दिवसांत कोरोना रुग्ण संख्येने 517 चा आकडा गाठला! या तुलनेत गत् 24 तासांत यात घट झाली असली तरी पॉझिटिव्हचा आकडा पावणेचारशेच्या पल्याड पोहोचलाच! आज ही संख्या 385 इतकी आली आहे.स्वॅब नमुने संकलनाच्या वेगात घट कायम असून, 24 तासांत 1598 नमुने संकलित करण्यात आले. याच धर्तीवर तपासण्याचा वेगही कमी झाल्याने …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः मागील 2 दिवसांत कोरोना रुग्ण संख्येने 517 चा आकडा गाठला! या तुलनेत गत्‌ 24 तासांत यात घट झाली असली तरी पॉझिटिव्हचा आकडा पावणेचारशेच्या पल्याड पोहोचलाच! आज ही संख्या 385 इतकी आली आहे.
स्वॅब नमुने संकलनाच्या वेगात घट कायम असून, 24 तासांत 1598 नमुने संकलित करण्यात आले. याच धर्तीवर तपासण्याचा वेगही कमी झाल्याने केवळ 1172 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांपैकी तब्बल 32.84 टक्के अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधित होण्याच्या टक्केवारीने धोकादायक पातळी गाठली आहे. आजवरचा पॉझिटिव्हीटी रेट 12.23 इतका असताना आजचा दर तब्बल 3 पटीने जास्त आलाय! याउलट 776 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत.

मलकापूरही स्पर्धेत…
दरम्यान आघाडावरील तालुक्यात मलकापूरदेखील मागे नसल्याचे दिसून येते. आज मलकापूर 98 पॉझिटिव्हसह आघाडीवर आहे, बुलडाणा 97 खामगाव 62, शेगाव 42, हे 4 तालुके अजूनही डेंजर झोनमध्ये वावरत आहेत. या ‘ग्रुपचा सदस्य’ असलेल्या चिखली 13 व देऊळगावराजा 13 या तालुक्यांतील रुग्णसंख्या खूपच कमी होणे हाच काय तो दिलासा ठरला आहे. मोताळा 27, जळगाव जामोद 17, सिंदखेड राजा 7, लोणार 7, मेहकर हे तालुके नियंत्रणात आहेत.