भास्कर वानखेडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक
बुलढाणा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा
Jul 7, 2025, 20:15 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :बुलढाणा पाेलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवल्या गेला आहे. जिल्हा पाेलीस दलात कार्यरत असलेले आणि वाडीब्रम्हपुरीचे सुपुत्र भास्कर उत्तमराव वानखेडे रा.वाडी ब्रह्मपुरी यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पाेलीस काॅन्स्टेबल पदापासून सुरु झालेला पाेलीस दलातील भास्कर वानखेडे यांचा प्रवास श्रेणी पाेलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पाेचहला आहे. त्यांनी ३६ वर्ष पाेलीस दलात गुणवत्तापूर्ण सेवा दिली आहे.
त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती यांच्याकडून १५ ऑगस्ट २०२२ रोजी घोषित झालेले राष्ट्रपती पोलीस पदक राज्यपाल राधाकृष्ण यांच्या शुभहस्ते राजभवन मुंबई येथे २०२५ मध्ये प्रदान करण्यात आले. त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे बुलढाणा पाेलिसांना दलाला राष्ट्रपती पोलीस पदक तब्बल दहा वर्षांनी मिळाले आहे.