दोन पुरुषांसह एका महिलेचा कोरोनामुळे मृत्‍यू; नवे 45 बाधित

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनामुळे आज, 12 जूनला दोन पुरुषांसह एका महिलेचा मृत्यू झाला. नव्या 45 बाधितांची भर पडली असून, 81 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3980 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3935 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनामुळे आज, 12 जूनला दोन पुरुषांसह एका महिलेचा मृत्‍यू झाला. नव्या 45 बाधितांची भर पडली असून, 81 रुग्‍ण बरे झाल्‍याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3980 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3935 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 45 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 28 व रॅपिड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 858 तर रॅपिड टेस्टमधील 3077 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 9, बुलडाणा तालुका : कोलवड 7, दहीद 1, डोंगरखंडाळा 2, अटकळ 1, रुईखेड 1, मलकापूर शहर :1, मलकापूर तालुका : आळंद 1, मोताळा तालुका : पुन्हई 1, कोथळी 4, सिंदखेड राजा तालुका : सवडत 1, देऊळगाव राजा तालुका : नारायणखेड 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : सावरगाव डुकरे 1, पेठ 1, शेगाव शहर : 2, मेहकर शहर : 2, जळगाव जामोद तालुका : मानेगाव 1, नांदुरा तालुका : वसाडी 1, जिगाव 1, लोणार तालुका : पांग्रा 1, संग्रामपूर तालुका : आकोली 1, शेवगा 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 45 रुग्ण आढळले आहे. उपचारादरम्यान वाडेगाव (ता. जळगाव जामोद) येथील 35 वर्षीय महिला, चिखली येथील 35 वर्षीय पुरुष व मोरगाव (ता. जामनेर) येथील 45 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू जिल्ह्यात झाला आहे.

367 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आज 81 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 526081 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84912 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1700 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 526081 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85923 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्‍णालयात 367 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 644 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.