जिल्हास्तरीय गौरी सजावट स्पर्धेत महिलांनी सहभागी व्हावे; अॅड. सौ. वृषालीताई बोंद्रे यांचे आवाहन

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या १० वर्षांपासून गौरी सजावटीसाठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्पर्धेेचे प्रथमच जिल्हास्तरीय आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा अॅड. सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी केले आहे. आकर्षक सजावट करत असताना मखर डेकोरेशन, रांगोळी, फुलोरा, त्याचबरोबर गौरींची आकर्षक …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्‍या १० वर्षांपासून गौरी सजावटीसाठी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्पर्धेेचे प्रथमच जिल्हास्तरीय आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा अॅड. सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी केले आहे.

आकर्षक सजावट करत असताना मखर डेकोरेशन, रांगोळी, फुलोरा, त्याचबरोबर गौरींची आकर्षक वेशभूषा व अलंकार अशा अनेक छटा दर्शविणाऱ्या या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे. स्पर्धेत नोंदणी करून सहभागी झालेल्या स्पर्धकांकडे १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत निरीक्षण समिती गौरी सजावटीचे निरीक्षण करणार आहे. १५ सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा समारोप हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या चिखली मुख्यालयासह बुलडाणा, धाड, अनुराधा नगर, केळवद, मेरा बु, अंचरवाडी, रायपूर, गांगलगाव, देऊळगाव मही, मोताळा, डोंगरशेवली येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी १० सप्टेंबरपर्यंत पुढील क्रमांकांवर संपर्क करावा.

चिखलीसाठी 9623937608, 07264244139, बुलडाणा 9527300945,9765475558, केळवद 8459503443, 8624850139, अंचरवाडी 9764864747, 7447460139, गांगलगाव 8888594836, 9067580139 देऊळगाव मही 9881125999, 9049980139, अनुराधानगर 9922073123, 8446341139, धाड 8329359949, 7276424139, मेरा बुद्रूक 8888053606, 8446132139, रायपूर 7276160139, डोंगरशेवली 7447790139, 9689050391, मोताळा 960372458, 07267 299138.