गृहिणी ते उद्योजिका.. सौ. आशा भालेकर यांच्‍या कर्तृत्‍वाची आमदार श्वेताताईंना भुरळ!; चिखलीत केला अनोखा सन्मान!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः “सन्मान कर्तृत्वाचा , जागर स्त्री शक्तीचा’ या उपक्रमात आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रेरणादायी ठरणाऱ्या ९ नारी शक्तींचा नवरात्रीत सन्मान करण्यात येत आहे. पहिल्या माळेला चिखली शहरात अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन स्वतःचा व्यवसाय वाढविणाऱ्या सौ. आशा मुरलीधर भालेकर या नारीशक्तीचा आमदार सौ. श्वेताताई …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः “सन्मान कर्तृत्वाचा , जागर स्त्री शक्तीचा’ या उपक्रमात आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रेरणादायी ठरणाऱ्या ९ नारी शक्तींचा नवरात्रीत सन्मान करण्यात येत आहे. पहिल्या माळेला चिखली शहरात अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन स्वतःचा व्यवसाय वाढविणाऱ्या सौ. आशा मुरलीधर भालेकर या नारीशक्तीचा आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्‍या हस्‍ते सन्मान करण्यात आला. साडी चोळी, मानचिन्ह, पुष्पगुच्छ देण्यात आला.

कोण आहेत आशाताई…
सौ. आशा मुरलीधर भालेकर या चिखली शहरातील प्रख्यात अशा महालक्ष्मी किराणा या प्रतिष्ठानच्या मालक आहेत. त्‍यांनी पती चालवत असलेल्या किराणा दुकानात सुमारे २० वर्षांपूर्वी स्वतः धान्य निवडून पॅकिंग करून द्यायला सुरुवात केली. त्यांच्या किराणा दुकानातून आणलेला किराणा अथवा धान्य गृहिणींना परत निवडण्याची आवश्यकता नसायची. त्यामुळे एकदा या दुकानातून ज्या ग्राहकाने किराणा घेतला तो परत दुसरीकडे गेलाच नाही. स्वतःपासून पॅकिंग करायला सुरुवात केलेल्या आशाताईंनी नंतर जसजसा व्याप वाढत जाईल तशा सहकार्यासाठी आणखी महिला सोबतीला घेतल्या. आजच्या परिस्थितीत त्यांच्याकडे ५५ महिला काम करत आहेत. सौ. आशाताई या महिलांना स्वखर्चाने सहलदेखील घडवून आणतात. किराणा दुकानात पॅकिंगचे काम करत असताना आशाताईंनी काही पदार्थांचे ब्रँडदेखील विकसित केले आहेत. यात येसवार, भगरीचे पीठ, साबुदाण्याचे पीठ, पापडाचे पीठ, बाफळ्याचे पीठ यासारख्या वाणांना दूरवरून मागणी येत असते.

सत्‍कारप्रसंगी यांची उपस्‍थिती…
कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती सौ. सिंधुताई तायडे, चिखली भाजपा शहर महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सुनिताताई भालेराव, प्रा. विरेंद्र वानखेडे, नगरसेवक नामु गुरुदासानी, चिखली तालुका विस्तारक सिद्धू ठेंग, सौ. सुषमा पोफळे, मुरलीधर भालेकर, सौ. प्रज्ञा भालेकर, सौ. निशा भालेकर आदींची प्रामुख्याने उपस्‍थिती होती.

आशाताई म्‍हणतात…
स्‍त्रीचे अंत:करण संवेदनशील स्‍त्रीच जाणू शकते. म्हणूनच सौ. श्वेताताई महाले या माझ्या मानसकन्येला ही कल्पना सूचल्याबद्दल मनःपुर्वक कौतुक करते व माझा सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त करते. भविष्यात जास्तीत जास्त निराधार महिलांना माझ्या व्यवसायाच्‍या माध्यमातून आधार देण्याचा संकल्प आहे.