कोरोनाने भरली “बॅग’!; टाटा करणार की आणखी ठेवून घेणार?… अवघे 30 नवे बाधित, एकूण उपचार घेणाऱ्यांची संख्या 310 वर!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना जिल्ह्यातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असून, बॅग भरून निघण्यासाठी तो जवळपास तयार झाला आहे. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची मेहनत, जोडीला राजकीय वर्तुळातील सामाजिक भान जपणाऱ्यांची साथ यामुळे कोरोनाला हरवण्यात प्रशासनाला दीर्घ लढाईनंतर यश येताना दिसत आहे. आज, 13 जूनला अवघे 30 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, एकूण उपचार घेणाऱ्यांचा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना जिल्ह्यातून गाशा गुंडाळण्याच्‍या तयारीत असून, बॅग भरून निघण्यासाठी तो जवळपास तयार झाला आहे. प्रशासन आणि आरोग्‍य यंत्रणेची मेहनत, जोडीला राजकीय वर्तुळातील सामाजिक भान जपणाऱ्यांची साथ यामुळे कोरोनाला हरवण्यात प्रशासनाला दीर्घ लढाईनंतर यश येताना दिसत आहे. आज, 13 जूनला अवघे 30 नवे पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, एकूण उपचार घेणाऱ्यांचा आकडाही आता 310 वर आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3516 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3486 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 30 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 17 व रॅपीड टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 534 तर रॅपिड टेस्टमधील 2952 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर :1, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 5, सिंदखेड राजा तालुका : भोसा 1, गोळेगाव 1, निमगाव वायाळ 1, देऊळगाव राजा शहर : 2, देऊळगाव राजा तालुका : जांभोरा 2, सिनगाव जहागीर 1, चिखली तालुका : तांदुळवाडी 2, कटोडा 1, शेलगाव जहागीर 1, कोलारा 1, जळगाव जामोद तालुका : सुनगाव 1, लोणार तालुका : डोरले महातखेड 1, बिबी 2, किन्ही 1, मेहकर तालुका : नायगाव 1, गवंढळा 1, संग्रामपूर तालुका : पातुर्डा 1, खामगाव शहर : 1, खामगाव तालुका : लांजूड 1, बोरी आडगाव 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 30 रुग्ण आढळले आहे.

तीन बळी
कोरोनामुळे उपचारादरम्यान वडोदा (ता. मुक्ताईनगर) येथील 60 वर्षीय महिला, शेळगाव आटोळ (ता. चिखली) येथील 45 वर्षीय पुरुष व जांभरून (ता. बुलडाणा) येथील 75 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

84 रुग्‍णांना डिस्‍चार्ज
आज 84 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 529567 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84996 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1966 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85953 कोरोनाबाधित रुग्ण असून,सध्या रुग्णालयात 310 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 647 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.