कोरोना अपडेट ः नव्या ३५ रुग्‍णांची भर, ४३ जणांना डिस्‍चार्ज, वाचा कोणत्‍या गावात किती…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, २४ जूनला ३५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ४३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3276 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 3241 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 35 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, २४ जूनला ३५ नव्या कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली आहे. ४३ रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3276 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 3241 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 35 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 23 व रॅपिड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 636 तर रॅपिड टेस्टमधील 2605 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : अजिसपूर 2, खामगाव शहर : 1, मोताळा तालुका : कोथळी 2, सिंदखेड राजा तालुका : नागझरी 1, वाकड 1, नांदुरा शहर : 7, नांदुरा तालुका : टाकरखेड 1, जिगाव 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : सावरगाव 1, देऊळगाव 1, वझर 1,गोत्रा 1, कारेगाव 1, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, देऊळगाव राजा तालुका : भिवगन 3, जळगाव जामोद शहर : 2, चिखली तालुका : बेराळा 2 अशाप्रकारे जिल्ह्यात 35 रुग्ण आढळले आहेत.

110 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार

आज 43 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 558132 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85675 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1409 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86441 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 110 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 656 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.