आपत्तीचे १६ बळी!; वर्षभरात पुराने १२, वीज पडल्‍याने तिघांवर काळाचा घाला!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीने गेल्या वर्षभरात १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील सर्वाधिक मृत्यू पावसाळ्यात पुरात वाहून गेल्याने व वीज पडल्याने झाले. पुरात वाहून गेल्याने १२ तर वीज पडून तिघांचा बळी गेल्याचे बुलडाणा लाइव्हच्या तपासणीत समोर आले आहे. नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्यांना शासनातर्फे प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्यात आली. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीने गेल्या वर्षभरात १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील सर्वाधिक मृत्यू पावसाळ्यात पुरात वाहून गेल्याने व वीज पडल्याने झाले. पुरात वाहून गेल्याने १२ तर वीज पडून तिघांचा बळी गेल्याचे बुलडाणा लाइव्‍हच्‍या तपासणीत समोर आले आहे. नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झालेल्यांना शासनातर्फे प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्यात आली.

सिंदखेडराजा तालुक्यात एकाच दिवशी ३ जणांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी १५ सप्टेंबर २०२० रोजी सिंदखेडराजा तालुक्यात गंगाराम शांतीराम भालेराव (३०), ज्ञानेश्वर धोंडिबा भालेराव (२१, रा. चांगेफळ), अविनाश सुरेश बांगर (२५, रा. कानडी) हे पुरात वाहून गेले होते. शेगाव तालुक्यात १५ जुलै रोजी उस्मान खाँ सरदार खाँ (८०, रा. जवळा बुद्रूक), ज्ञानेश्वर अर्जुन गुरव (३२, रा. कालखेड), अशोक संपत समदूर (५५, रा. कालखेड) यांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. सिंदखेड राजा तालुक्यात ३, मेहकर तालुक्यात २, खामगाव तालुक्यात ३, शेगाव तालुक्यात ३, संग्रामपूर तालुक्यात ३ तर नांदुरा व मलकापूर तालुक्यात प्रत्येकी एकाला पुराने जलसमाधी दिली होती. संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ बुद्रूक येथील भावेश सुभाष साबे या १० वर्षीय चिमुकल्याचा झाडाखाली दबून मृत्यू झाला होता.